DISTRICT SETU COMMITTEE, NANDED

COLLECTOR OFFICE NANDED

“आपले सरकार सेवा केंद्र” मिळणेकामीच्या अटी व शर्ती


  1. महाराष्ट्र शासन, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मातंसं-1716/प्र.क्र.517/39 दिनांक 19 जानेवारी, 2018 मधील निकष, कार्यपद्धती, सुविधा, जबाबदाऱ्या, कारवाईची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेस अधीन राहून केंद्राची नियुक्ती करुन केंद्र कार्यान्वित केले जाईल. तसेच वेळोवेळी प्रसिद्ध होणारे शासन निर्णय/परिपत्रक/शुद्धीपत्रकात दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. त्याचा भंग केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र बंद करण्यात येईल.
  2. उमेदवार हा गुंतवणुकीचे दृष्टीकोनातून सक्षम असला पाहिजे.
  3. उमेदवाराने संगणक साहित्य व इतर अनुषंगिक साहित्य व जागा उपलब्ध असल्याबाबत योग्य तो तपशील जोडणे आवश्यक आहे.
  4. महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबत 19 जानेवारी, 2018 व दि. 02 जून 2025 च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून केंद्राची नियुक्ती केली जाईल. तसेच अर्जदारांना अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.
  5. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात प्रसिद्ध करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचा (software) इ. योग्य वापर, संरक्षण, व जतन करणे अर्जदारांना बंधनकारक राहील.
  6. आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित ठिकाणीच चालविणे क्रमप्राप्त आहे.
  7. संबंधित अर्जदार यांना जिल्हयामध्ये (ग्रामीण भागात) फक्त एकाच ठिकाणी नव्याने “आपले सरकार सेवा केंद्रा” साठी अर्ज करता येईल.
  8. अर्जदार यांना अर्ज भरण्याबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी कार्यालयातील सेतू विभागाकडून अधिक माहिती प्राप्त करुन घ्यावी. इतर त्रयस्थ व्यक्तीमार्फत अर्ज सादर करु नये. तसे निदर्शनास आल्यास आपला अर्ज अपात्र ठरविणेत येईल.
  9. आपले सरकार सेवा केंद्राना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल. तसेच त्यांना केंद्राबाबत मागविलेला अहवाल तात्काळ सादर करावा लागतील.
  10. शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सेवा आपले सरकार सेवा केंदातून ऑनलाईन पद्धतीने देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची गंभीर दखल घेण्यात येईल व चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल.
  11. निर्गत केलेल्या दाखल्याच्या / प्रमाणपत्राच्या स्थळप्रती पुढील महिन्यात संबंधित उपविभागीय अधिकारी / तहसिल कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.
  12. अर्जदारास मंजूर करण्यात आलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालविणे बंधनकारक असेल. मंजूर करण्यात आलेल्या ठिकाणी केंद्र चालवित नसल्यास अथवा दुसऱ्या ठिकाणी चालवित असल्याचे आढळून आल्यास संबंधित केंद्रचालकाची अनामत रक्कम जप्त करून केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात येईल व त्याचे नाव आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याच्या काळया यादीत समाविष्ट करण्यात येईल.
  13. अर्जामध्ये भरलेली माहिती चुकीची आढळल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  14. अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाल्यानंतर अर्जदारांनी 03 महिन्याच्या कालावधीमध्ये एकही व्यवहार न केल्यास त्यांना मंजूर करण्यात आलेले केंद्र रद्द करून अर्जासोबत दिलेली अनामत रक्कम रु. 20,000/- जप्त करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा केंद्र चालू होणार नाही.
  15. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांनी नियुक्त केलेले तांत्रिक अधिकारी हे आपले सरकार सेवा केंद्राची संपूर्ण चौकशी करू शकतील.
  16. केंद्र व राज्य शासनाचे/निमशासकीय/सार्वजनिक उपक्रम/महामंडळे यांचे सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करता येणार नाही.
  17. आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज प्रक्रियेत ग्रामपंचायत मधील रुजू असलेले केंद्र चालक या प्रक्रियेसाठी अपात्र असतील.
  18. प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्वीकारायचा, कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण प्रक्रिया कोणतेही कारण न देता रद्द करण्याचे अधिकार मा. अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती, (जिल्हा ई-गव्हर्नन्स सोसायटी), तथा जिल्हाधिकारी, नांदेड यांचेकडे राखून ठेवण्यात आले आहे.
  19. अर्जदारांनी या प्रक्रियेबाबत कार्यालयात येऊ नये. उपरोक्त सर्व प्रक्रियेसाठी आपण वेळोवेळी https://nanded.gov.in आणि https://setusamitinanded.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  20. अर्जदारास कोणत्याही प्रक्रियेबाबत वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.